Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुधोजी महाविद्यालयात तत्वज्ञान सप्ताह साजरा saptah

 



साखरवाडी(गणेश पवार)

             मुधोजी महाविद्यालय फलटण येथे १३ मार्च ते १७ मार्च असा तत्त्वज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला तत्त्वज्ञान सप्ताहाची सुरुवात तत्त्वज्ञान विभाग आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 'इस्लाम धर्मातील नीतिमूल्ये ' या विषयावर प्रा फिरोज शेख, इंग्रजी विभाग यांचे व्याख्यान आयोजित केले होते, त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून इस्लाम धर्माचे नैतिक स्वरूप स्पष्ट केले 

                या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ पी एच कदम  उपस्थित होते, या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते, सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक १४ मार्च रोजी ' लिव्ह इन रिलेशनशिप की लग्न संस्था' या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि अभ्यासपूर्वक संबंधित विषयावर आपली मते प्रकट केली 

             याचबरोबर राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. दिनांक १५ मार्च रोजी तत्त्वज्ञान विभाग आणि प पू गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था यांच्या परस्पर सामंजस्य करारातून महाविद्यालयीन युवकांना विशेषतः तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना किर्तन ही एक अभ्यासपूर्ण  कला आहे, या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे हा हेतू ठेवून ह भ प रामदास महाराज कदम गोखळी , माजी विद्यार्थी यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला

              दिनांक १६ मार्च रोजी फलटण दर्शन अंतर्गत अभ्यासाचा भाग म्हणून महानुभावांची दक्षिण काशी असलेल्या महानुभाव मंदिरांना भेट देण्यात आली , याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संप्रदायाची चौकस बुद्धीने माहिती घेतली त्यासाठी त्यांना संप्रदायाचे महंत मुकुंदराज बाबा बिडकर आणि गोविंदराज बाबा लांडगे यांचे मार्गदर्शन झाले. दिनांक १७ मार्च रोजी महाविद्यालयात तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने श्रमदान व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, मा प्राचार्य डॉ पी एच कदम यांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. दिनांक १८ मार्च रोजी तत्त्वज्ञान सप्ताहाची सांगता  झाली 

              या दिवशी मा प्रा सायरा मुलाणी, कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना ॲड विश्वनाथ टाळकुटे हायकोर्ट मुंबई यांच्या वतीने देणारे देण्यात येणारी पारितोषिके माननीय प्राचार्य डॉ पी एच कदम यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली, तसेच विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी प्रा सायरा मुलाणी यांनी 'स्पर्धा परीक्षा व तर्कशास्त्र , या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात व पारंपरिक दिवस मध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला  आणि तत्त्वज्ञान सप्ताहाची यशस्वी सांगता झाली. या सर्व कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एच कदम हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन विभागातील प्रा सतीश पवार, प्रा विलास टिळेकर, प्रा कु गौरी गायकवाड, प्रा स्वरूप अहिवळे, प्रा सचिन कदम तसेच  विद्यार्थी यांनी उत्तमरीत्या केले या कार्यक्रमांचे नेटके सूत्रसंचालन प्रा अभिजीत धुलगुडे यांनी केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.