फलटण चौफेर दि १६ मार्च २०२५ - धार्मिक यात्रेला निघालेल्या क्रुझर गाडीचा ओडिसा राज्यातील बा लासोर जिल्हयात अपघात होऊन यामध्ये विडणीतील एक महिला ठार झाली असून सातजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की विडणी ता.फलटण येथील नामदेव काळूखे यांच्या क्रुझर गाडीने बारामती तालुक्यातील माळवाडी लोणी येथील 11 जण देवदर्शनासाठी प्रवास करत असतानाच ओडिसातील प्रसिद्ध श्री. जगन्नाथ मंदिराचे दर्शनासाठी जात असतानाच ओडिसातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवार दि.13 मार्च रोजी रात्री क्रुझर गाडीचा मोठा अपघात झाला असून यामध्ये क्रुझर गाडीचे चालक नामदेव काळूखे यांच्या पत्नी सौ संगीता काळूखे ( वय -45)रा.विडणी यांचा उपचारादरम्यानच काल रविवारी रात्री मृत्यु झाला असून यामध्ये चालक नामदेव काळूखे यांच्यासह सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बालासोर येथील फकीर मोहन मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती नातेवाईकांना उशीरा समजल्याने व हा अपघात दूरवर असलेल्या ओडिसा राज्यात घडल्याने त्याठिकाणी उपचारासाठी अडचणी आल्या होत्या दरम्यान विडणी व माळेवाडी लोणी येथील कुटुंबीय व नातेवाईक तिकडे निघालेले असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली त्यानंतर त्यांनी धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असलेले व बालासोरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले मयुर सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली त्यानंतर सुर्यवंशी यांनी ताबडतोब यंत्रणा लावून जखमींवर उपचार सुरु केले तर अपघातात मृत्यु पावलेल्या संगीता काळूखे यांचे पार्थीव थेट विमानाने पुण्यात आणण्याची प्रशासनाने सोय केली असून हे पार्थीव आज पुण्याहून विडणी येथे येणार असून त्यांच्यावर आज सोमवार दि.16 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काळूखे परिवाराने दिली आहे.


COMMENTS