फलटण चौफेर दि १८ ऑगस्ट २०२५
फलटण तालुक्यातील वडजल हद्दीत फलटण-लोणंद रोडवर रविवारी रात्री सव्वा आठ वाजता झालेल्या अपघातात विश्वराज उर्फ बंटी बाळू पिसाळ (वय २५, रा. वडजल, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आरती पिसाळ जखमी झाली आहे.ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण लिंगाप्पा कोळी (वय ३५, रा. मंगळुर, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर) हा चारचाकी (क्र. MH 14 BG 1777) बेदरकारपणे व भरधाव वेगात चालवत होता. या वेगवान वाहनाने वडजल चौकाच्या पाठीमागे समोरून जात असलेल्या मोटारसायकल (क्र. MH 11 CZ 9266) ला जोरदार धडक दिली.
या धडकेत मोटारसायकलस्वार विश्वराज उर्फ बंटी पिसाळ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र तेव्हाच त्यांचा मृत्यू झालाअशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर पोलीसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे