साखरवाडी (शिवाजी भोसले)
साखरवाडी(पिंपळवाडी) ता फलटण गावाच्या हद्दीत एका शेतामध्ये अनोळखी पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे आज सकाळी सदर घटना काही नागरिकांच्या निदर्शनास आली त्यांनी फलटण पोलिसांना या घटनेची माहिती दिली यावर तात्काळ या ठिकाणी फलटण ग्रामीणचे पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे मात्र कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह सापडल्याने साखरवाडी सह परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे