फलटण चौफेर दि १२ फलटण-सातारा रोडलगत राजापूर ता फलटण गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता १५ हजार रुपये किंमतीची बिगर परवाना देशी दारू ठेवल्याप्रकरणी संशयित चंद्रकांत धनाजी माने रा. साखरवाडी ता. फलटण व पोलीस पाटील शंकर मुगुटराव नलवडे रा. आळजापूर ता. फलटण यांच्यावर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधुन मिळालेली आधिक माहितीनुसार अळजापूर ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण-सातारा रोडच्यालगत असणाऱ्या श्रीनाथ हॉटेलमध्ये संशयित चंद्रकांत धनाजी माने रा. साखरवाडी ता. फलटण व शंकर मुगुटराव नलवडे रा. आळजापूर ता.फलटण हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १५ हजार रुपये किंमतीची बेकायदा बिगर परवाना दारु विक्री करत असताना आढळून आल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद संभाजी प्रकाश जाधव यांनी दिली आहे