Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यात वीज पडून शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

 


फलटण चौफेर दि ११

आज दि ११ रोजी सरडे ता फलटण गावाच्या हद्दीत दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांवर वीज कोसळल्याने तिघेजण जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे वीज कोसळल्याने  ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वय १७ रा वंजारवाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या अल्पवयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अल्पवयीन प्रथमेश सुनील भिसे  वय १७ राहणार वायसेवाडी ता कर्जत जिल्हा अहमदनगर व विक्रम विजय धायगुडे वय १६ रा सरडे.हे जखमी झाले असून त्यांच्यावर  बारामती मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वरील तीनही विद्यार्थी शारदानगर येथे आयटीआयचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती फलटणचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी दिली 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.