Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चौधरवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट

 



फलटण चौफेर दि ४ जुलै २०२५

चौधरवाडी ता फलटण येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित चौधरवाडी हायस्कूल, चौधरवाडी येथील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधानभवनाला शैक्षणिक सहल आयोजित केली होती. या अभ्यासभेटी दरम्यान आमदार सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांची आवर्जून भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.या भेटीत आमदार सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांना संसदीय कामकाज, विधीमंडळाची कार्यपद्धती आणि प्रशासन याविषयी अधिकाऱ्यांमार्फत सविस्तर माहिती देण्याची विशेष व्यवस्था केली  


या शैक्षणिक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्याच्या विधीमंडळाची प्रत्यक्ष ओळख होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या अभ्यासभेटीवेळी चौधरवाडीचे सरपंच तुकाराम कोकाटे, सागर कदम, शिक्षकवर्ग आणि मार्गदर्शक शिक्षिका उपस्थित होत्या.अशी अभ्यासभेट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते आणि भविष्यात सामाजिक भान असलेले जबाबदार नागरिक घडविण्यास हातभार लागतो, असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.