Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बागेवाडी(बरड) येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार




फलटण चौफेर दि १२
  बागेवाडी(बरड)ता फलटण गावात काल रात्री बिबट्याच्या  हल्ल्यात शेतकरी  धोंडीराम पाचांगणे यांचे वासरु ठार झाले असून अजून एक वासरू व शेळी जखमी झाले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी मागील काही दिवसांपासून फलटण पूर्व भागात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढू लागला आहे काल रात्री ११ ते ११.३० च्या सुमारास  बागेवाडी येथील धोंडीराम पाचांगणे  यांच्या  गोठ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार झाले व दुसरे एक वासरु एक शेळी जखमी झाली झाले आहे यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.