फलटण चौफेर दि ३ जुलै २०२५
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उत्साहात सुरू झाली असून, नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.महाविद्यालयात बी.टेक. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड डेटा सायन्स, कंप्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय, बी.वोक. (B.Voc) अभ्यासक्रमांतर्गत डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, इंटीरियर डिझाईन व ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग हे कोर्सेस देखील चालू आहेत.
डिप्लोमा स्तरावर मेकॅनिकल, कंप्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन व सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. हे सर्व अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित असून, आधुनिक प्रयोगशाळा, प्रशिक्षित प्राध्यापकवर्ग व आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली जाते.
उल्लेखनीय बाब म्हणजे, महाविद्यालय NAAC 'A' ग्रेडने मानांकित असून, डिप्लोमा अभ्यासक्रम NBA क्रेडिटेड आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, इनोव्हेशन व आयपीआर साठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच, सिबिक इन्क्युबेशन सेंटरच्या सहकार्याने संशोधन व स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिले जाते.
होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी श्रीमंत मालोजीराजे मेरिट स्कॉलरशिप, कमीन्स स्कॉलरशिप, भटेवरा फाउंडेशन स्कॉलरशिप चा लाभ मिळतो. तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती देखील मिळते.शांत, स्वच्छ व सुरक्षित परिसर, शिस्तबद्ध वातावरण, आणि अद्ययावत शैक्षणिक सुविधा यामुळे हे महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरते आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण हे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम पसंतीचे केंद्र ठरत आहे, असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.