फलटण चौफेर दि. १ सप्टेंबर २०२६
पाच सर्कल खामगाव (ता. फलटण) येथील मोहिते वस्ती परिसरात निरा उजवा कालव्याच्या तेरा फाटा येथे भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या रस्त्यालगतच्या शेत परिसरातून जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून, त्याचे छायाचित्रही मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मोहिते वस्ती परिसरात नागरिक व शेतकऱ्यांची वर्दळ असतानाच बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली. मानवी वस्तीजवळच बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येत असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाकडून देण्यात येत आहेत.दरम्यान, नागरिकांनी बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये. शेतात किंवा परिसरात एकट्याने जाणे टाळावे आणि बिबट्याबाबतची माहिती तातडीने वनविभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





COMMENTS