Breaking News

फलटण चौफेर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादक- गणेश पवार

सुखेड येथील विहिरीत आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या हत्येचा उलगडा; चार संशयित ताब्यात

  



फलटण चौफेर दि. ९ फेब्रुवारी २०२६

खंडाळा तालुक्यातील मौजे सुखेड (जि. सातारा) गावच्या हद्दीतील चोपडे वस्ती परिसरात विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत, हातपाय बांधलेल्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासांत उलगडा करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ,दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आबा जयवंत चोपडे यांच्या विहिरीत अंदाजे २५ ते ३० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत असून हातपाय बांधलेले असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा उघड करण्याच्या सूचना देण्यात आल्या.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील साक्षीदारांची चौकशी, घटनास्थळाकडे ये-जा करणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत एक संशयित वाहन निष्पन्न केले. सलग तीन दिवस अहोरात्र तपास केल्यानंतर या घटनेचा धागा कळंबोली, साखरवाडी (ता. फलटण) आणि पुणे येथे राहणाऱ्या संशयितांपर्यंत पोहोचला.बंडू बापू भिसे (वय ४९) – रा. कळंबोली (मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण)विजय पोपटराव पवार (वय ३६) – रा.(माडकरमळा) साखरवाडी, ता. फलटण,किरण विकास गायकवाड (वय २७) – सध्या रा. पुणे (मूळ रा. होळ, ता. फलटण),श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय २५) – सध्या रा. धायरी, पुणे (मूळ रा.चुरमापुरी, जि. जालना) यांना अटक केली आहे पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांने त्याच्या मैत्रिणीबरोबर मयत सोमनाथ कल्याण बोबडे, रा. सेक्टर २०, कळंबोली ता. पनवेल जि. रायगड

 याचे अनैतिक संबंधाच्या संशयातून इतर साथीदारांच्या मदतीने कळंबोलीहून त्याच्या चार चाकी गाडी क्रमांक mh 12 DY 8846मधून अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीत टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कळंबोली, साखरवाडी आणि पुणे येथून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून  कोणतेही स्पष्ट पुरावे नसतानाही अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून अवघ्या ७२ तासांत प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS

हवामान

+27
°
C
H: +29°
L: +20°
Pune
Tuesday, 26 October
See 7-Day Forecast
Wed Thu Fri Sat Sun Mon
+29° +29° +29° +30° +30° +30°
+19° +19° +19° +19° +20° +20°
Name

Opening,1,Politics,3,Satara,1,अनावरण,3,अपघात,38,अफवा,1,अभिमान,8,आकस्मिक,1,आकस्मिक निधन,2,आंदोलन,15,आरोग्य,3,आरोग्य शिबीर,4,उत्सव,7,उदघाटन,9,उद्घाटन,1,उद्योग,22,कारवाई,16,कार्यक्रम,112,कृषी,12,कोरेगाव,1,खंडाळा,1,खेळ,21,गुन्हा,17,गुन्हेगारी,176,गैरसोय,6,घोटाळा,1,जयंती,9,जाहिरात,14,जाहीरात,1,जिल्हाधिकारी,1,दहिवडी,1,दुर्घटना,1,दुर्दैवी,1,दुष्काळ,1,देशविदेश,1,धार्मिक,25,निधन,10,निधन वार्ता,11,निवड,19,निवडणूक,57,नुकसान,7,परीक्षा,1,पशुधन,1,पाऊस,44,पालखी,16,पुरस्कार,26,पुसेगाव,1,पोलीस कारवाई,1,प्रशासन,53,फलटण,155,बंद,1,बदली,1,बंदी,1,बारामती,1,बाल जगत,1,बेपत्ता,3,भरती,2,भूमीपूजन,2,मदत,1,महाराष्ट्र,6,महिला,2,मागणी,5,मृत्यू,2,यात्रा,1,रक्तदान,6,राजकारण,3,राजकिय,11,राजकीय,208,लोणंद,4,वाई,1,वाढदिवस,2,विशेष,39,विषेश,6,विसर्जन,1,वीर जवान,1,व्यवसाय,2,व्यापार,1,शिक्षकदिन,4,शिक्षण,6,शिबिर,1,शिबीर,1,शुभारंभ,1,शैक्षणिक,228,सत्कार,1,सन्मान,4,संप,1,सभा,2,समस्या,45,सर्वसाधारण सभा,1,सहकार,2,साखरवाडी,2,सातारा,11,सामाजिक,8,सोमेश्वर,1,स्पर्धा,1,स्वछता,1,स्वागत,1,
ltr
item
Phaltan Chaufer : सुखेड येथील विहिरीत आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या हत्येचा उलगडा; चार संशयित ताब्यात
सुखेड येथील विहिरीत आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या हत्येचा उलगडा; चार संशयित ताब्यात
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiyvi0cXMOBm66C441JxWDBXW7C_sVOdE6GvVQR8R3lSq8Z_azgPV92OGliJ_LqZwIXOt-howbtlLJ9Ca4reSggMh76FgJJJe_ZiXWp4JLvSF9NPBR7SZ1zHaIKaLZzXIkawmCYF07U3PCdeqfTUoUiQQHdRzYSsG2ewPzP_q7440m-JnoNoK_DQLZCb2K/s16000/1004986889.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiyvi0cXMOBm66C441JxWDBXW7C_sVOdE6GvVQR8R3lSq8Z_azgPV92OGliJ_LqZwIXOt-howbtlLJ9Ca4reSggMh76FgJJJe_ZiXWp4JLvSF9NPBR7SZ1zHaIKaLZzXIkawmCYF07U3PCdeqfTUoUiQQHdRzYSsG2ewPzP_q7440m-JnoNoK_DQLZCb2K/s72-c/1004986889.jpg
Phaltan Chaufer
https://www.phaltanchaufer.com/2026/02/Lonanad.html
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/2026/02/Lonanad.html
true
6954989630771428239
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy