विडणी(योगेश निकाळजे) - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील विडणी येथील पवारवाडीवस्ती येथे दुचाकीवरून फलटणला कॉलेजला जात असताना डिवाइंडरला धडकून झालेल्या अपघातात एक युवती जागीच ठार झाली तर दोघीजणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
आज शुक्रवार दि.4 सप्टेंबर रोजी सकाळी 9. 15 च्या सुमारास विडणी ता.फलटण ( गाडे-पवारवस्ती ) येथील कु. सिद्धी दशरथ पवार ( वय -19) ही आपली लहान बहीण रिद्दी व आजी कौसल्याबाई अशा तिघीजणी इलेक्ट्रिड स्कुटी गाडीवरून विडणीच्या दिशेने जात असतानाच (गाडे - पवारवस्ती) नजीकच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कडेला असणाऱ्या डिवाइंडरला धडकून गाडी घासत पुढे सुमारे वीस फुटावर असणाऱ्या विद्युत पोलला जोरदार धडकली यामध्ये सिद्धी हीच्या पायाला डोक्याला गंभीर दुखापत होऊन तीचा जागीच मृत्यु झाला तर पाठीमागे बसलेली तिची लहान बहीण व आज्जी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिद्धी ही खूप मेहनती व अभ्यासात हुशार होती ती फलटण येथील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती आज सकाळी कॉलेजला जात असताना लहान बहीण व आज्जी या दोघींना विडणी गावात सोडून तशीच पुढे फलटणला कॉलेजला निघाली होती, मात्र तिच्यावर काळाने झडप घातली या घटनेने संपूर्ण विडणी गावात व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






COMMENTS