Breaking News

फलटण चौफेर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादक- गणेश पवार

वाठार निंबाळकर हद्दीत भीषण कार अपघात; कमिन्सच्या तीन कामगारांचा मृत्यू, तिघे जखमी

 



फलटण चौफेर दि २४ जुलै २०२६:

 फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर हद्दीत झालेल्या भीषण कार अपघातात सुरवडी ता फलटण येथील कमिन्स कंपनीतील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या नाल्याच्या कठड्यावर आदळून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, 23 जुलै रोजी फिर्यादी व त्यांचे सहकारी काम आटोपल्यानंतर वाठार निंबाळकर येथील वसतिगृहात आले. रात्री सर्वजण कार  क्र एम एच १६ ए टी १७५६ मधून फलटण लोणंद पालखी महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर  ताथवडे घाट परिसरात फेरफटका मारून परत येत असताना सुरुवातीला फिर्यादी नयन लोंगाणी हे वाहन चालवत होते. त्यानंतर मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश) याने वाहन चालविण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्याच्याकडे वाहनाचा ताबा देण्यात आला.पुसेगाव–फलटण मार्गावर वाठार निंबाळकर हद्दीत आल्यानंतर भरधाव वेगामुळे वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन नाल्याच्या कठड्यावर जोरात आदळली आणि पलटी झाली. अपघातात वाहनातील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ फलटण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम (रा. जमशेदपूर, झारखंड) आणि सदानंद पुर्ती (रा. जमशेदपूर, झारखंड) यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या अपघातात नयन लोंगाणी, सौरभ कुमार (झारखंड) व एम. डी. सितारे (बिहार) हे जखमी झाले असून, सौरभ कुमार यांना पुढील उपचारासाठी बारामती येथे, तर एम. डी. सितारे यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS

हवामान

+27
°
C
H: +29°
L: +20°
Pune
Tuesday, 26 October
See 7-Day Forecast
Wed Thu Fri Sat Sun Mon
+29° +29° +29° +30° +30° +30°
+19° +19° +19° +19° +20° +20°
Name

Opening,1,Phaltan,1,Phaltan political,1,Politics,3,Satara,1,अनावरण,3,अपघात,42,अपघात फलटण पुसेगाव ताथवडे,1,अफवा,1,अभिमान,8,आकस्मिक,1,आकस्मिक निधन,2,आंदोलन,16,आरोग्य,3,आरोग्य शिबीर,4,उत्सव,7,उदघाटन,9,उद्घाटन,1,उद्योग,22,उपक्रम,1,कारखाना फलटण,1,कारवाई,19,कार्यक्रम,112,कृषी,12,कोरेगाव,1,खंडाळा,1,खंडाळा गुन्हेगारी,1,खामगाव,1,खेळ,22,गुन्हा,17,गुन्हेगारी,196,गैरसोय,6,घोटाळा,1,जयंती,9,जाहिरात,14,जाहीरात,1,जिल्हाधिकारी,1,दहिवडी,1,दुर्घटना,1,दुर्दैवी,1,दुष्काळ,1,देशविदेश,1,धार्मिक,25,नगरपरिषद,1,निधन,11,निधन वार्ता,11,निरा खोरे,2,निरा खोरे पाऊस,15,निराखोरे पाऊस,1,निवड,20,निवडणूक,57,निवेदन,1,नुकसान,7,परीक्षा,1,पशुधन,1,पाऊस,54,पालखी,16,पालखी महामार्ग,1,पालखी सोहळा फलटण,2,पुरस्कार,26,पुसेगाव,1,पोलीस,2,पोलीस कारवाई,1,प्रशासन,58,फलटण,167,फलटण nagarparishad,1,फलटण अपघात,1,फलटण उद्योग,2,फलटण गुन्हेगारी,1,फलटण पालखी अपघात,1,फलटण पालखी सोहळा,1,फलटण राजकीय,7,फलटण विशेष,1,बंद,1,बदली,1,बंदी,1,बारामती,1,बाल जगत,1,बेपत्ता,3,बैठक,1,भरती,2,भूमीपूजन,2,मदत,1,महाबळेश्वर,1,महाराष्ट्र,6,महिला,2,मागणी,5,मृत्यू,2,यात्रा,2,रक्तदान,6,राजकारण,3,राजकिय,12,राजकीय,224,लोणंद,4,लोणंद-सातारा रस्ता प्रशासन,1,वाई,1,वाढदिवस,2,विशेष,41,विषेश,6,विसर्जन,1,वीर जवान,1,वीर धरण पाणी,1,व्यवसाय,2,व्यापार,1,शिक्षकदिन,4,शिक्षण,6,शिबिर,1,शिबीर,1,शुभारंभ,1,शैक्षणिक,237,श्रीराम,1,सत्कार,1,सन्मान,6,संप,1,सभा,2,समस्या,50,सर्वसाधारण सभा,1,सहकार,4,साखरवाडी,4,साखरवाडी गुन्हेगारी,1,साखरवाडी राजकीय,2,साखरवाडी विशेष,1,साखरवाडी शैक्षणिक,1,साखरवाडी समस्या,3,सातारा,12,सामाजिक,8,सोमेश्वर,1,स्पर्धा,1,स्मृतिदिन,1,स्वछता,1,स्वागत,1,
ltr
item
Phaltan Chaufer : वाठार निंबाळकर हद्दीत भीषण कार अपघात; कमिन्सच्या तीन कामगारांचा मृत्यू, तिघे जखमी
वाठार निंबाळकर हद्दीत भीषण कार अपघात; कमिन्सच्या तीन कामगारांचा मृत्यू, तिघे जखमी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgH53uApSIDpt7nYjLGHkzzR6LfN2sPe81Guqti9H9I9AcnZh3xXOFN7CRXifKZXBuPt5fWfRNPN-g8GhoMHzkIB1MfwhF36SepojLLF2R9hc23x54vuEsm68D3zl15WDKB8kxbQE6fMp0xKIbBpHgihn880vCG5Avl3f4_6fazWIKTIwwlB7E_AQaESp9K/s1600/1005965503.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgH53uApSIDpt7nYjLGHkzzR6LfN2sPe81Guqti9H9I9AcnZh3xXOFN7CRXifKZXBuPt5fWfRNPN-g8GhoMHzkIB1MfwhF36SepojLLF2R9hc23x54vuEsm68D3zl15WDKB8kxbQE6fMp0xKIbBpHgihn880vCG5Avl3f4_6fazWIKTIwwlB7E_AQaESp9K/s72-c/1005965503.jpg
Phaltan Chaufer
https://www.phaltanchaufer.com/2026/07/Phaltan%20accident.html
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/2026/07/Phaltan%20accident.html
true
6954989630771428239
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy