फलटण चौफेर दि २१ फेब्रुवारी २०२५
जिंती तालुका फलटण गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री बुवासाहेब बबनराव रणवरे उर्फ शरद सर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली याप्रसंगी सरपंच व सर्व सदस्य तसेच श्री जितोबा ग्रामविकास पॅनेलचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते निवडणूक कामकाज सर्कल अधिकारी श्री गाडे साहेब यांनी काम पाहिले तसेच याप्रसंगी तलाठी नलगे भाऊसाहेब आणि ग्रामविकास अधिकारी श्री बनकर अण्णा उपस्थित होते..या निवडीबद्दल विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक राव चव्हाण यांनी शरदराव रणवरे सर यांचे अभिनंदन केले.