फलटण (दि. १३ जुलै २०२५) :
फलटण शहरातील बस स्टँडसमोरील भवानी मार्केट येथील पार्किंग बेसमेंटमधून एका दुचाकी चोरीची घटना घडली आहे. रविवारी, १३ जुलै २०२५ रोजी ही घटना घडली असून, चोरीला गेलेली दुचाकी ही काळ्या रंगाची प्लेटिना (MH 11 AH 6948) क्रमांकाची आहे.दुचाकीची पार्किंग भवानी मार्केटच्या बेसमेंटमध्ये करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ती चोरीस गेल्याचे लक्षात आले. कोणालाही ही दुचाकी कुठेही दिसल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.
📞 मो. 9834229599
स्थानिक नागरिकांनी सतर्क राहून अशी माहिती तत्काळ पोलीस किंवा वरील क्रमांकावर कळवावी, जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर पकडता येईल आणि वाहन मालकाला न्याय मिळू शकेल.