साखरवाडी (गणेश पवार)
सोनवडी बुद्रुक ता फलटण येथील भाडळी रस्त्यावर महारकी नावाच्या शिवारात एकूण तीन शेडमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 44 वासरांची फलटण पोलिसांनी छापा टाकून सुटका केली असून एकूण आठ जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संशयित हिलाही हुसेन कुरेशी, शाहिद रशीद कुरेशी, शाहरुख जलीन कुरेशी, दिशान इमान कुरेशी, तौफिक इम्ताज कुरेशी, इनायक हुसेन कुरेशी, आफताब अफसर कुरेशी सर्व रा कुरेशी नगर फलटण व रामा भानुदास जाधव राहणार पुजारी कॉलनी फलटण यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सोनवडी बुद्रुक येथील भाडळी रस्त्यावर महारकी नावाच्या शिवारात तीन पत्र्याच्या शेडमध्ये चारा पाण्याची सोय न करता कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 88 हजार रुपये किमतीच्या 44 वासरांची सुटका केली असून फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमोल घोरपडे यांनी दिली असून तपास सहाय्यक पोलीस फौजदार खाडे करीत आहेत.