Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खटाव,पुसेगावला गारपीटीने झोडपले वीट भट्टी,कांदा पिकाचे लाखोंचे नुकसान garpit

 


साखरवाडी(गणेश पवार)

 खटाव, तालुक्याच्या उत्तर भागातील पुसेगाव , रणसिंगवाडी , वेटणे , बुध परिसराला शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या गारांच्या पावसाने झोडपून काढले . धुवाधार पावसाने वीटभट्ट्यांचे आणि काढणीला आलेल्या कांदा पिकाचे लाखोंचे नुकसान झाले . सातारा - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील दोन्हीं बाजूच्या गटारांचे काम रखडल्याने पावसाचे पाणी बाजूच्या घरांत तसेच बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरून मोठे नुकसान झाले . शनिवारी सायंकाळी वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह खटाव तालुक्याच्या उत्तर भागात जोरदार पाऊस झाला . अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली . काही ठिकाणी शेतात उघड्यावर पडलेला ज्वारीचा कडबा भिजून खराब झाला . मका व भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले . जोरदार गारपीट झाल्याने शेतात उभी असलेली पिके व काढणीयोग्य झालेले कांद्याचे पीक सडून जाण्याची भीती आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.