Breaking Posts

Type Here to Get Search Results !

जैविक कीड नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी सुरवडीत कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांसमोर प्रात्यक्षिक

 


फलटण चौफेर दि २०

मागील काही वर्षांमध्ये कीड नियंत्रणासाठी वाढलेल्या रासायनिक किडनाशकांच्या वापरामुळे किडीमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होत आहे. यासाठी किडीच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर वाढण्याची आवश्यकता आहे. निसर्गात आढळणाऱ्या बुरशीद्वारे किडीचे नियंत्रण पर्यावरणपूरक पद्धतीने शक्य आहे याचे प्रात्यक्षिक डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या कृषीकन्यांनी करून दाखविले. यामध्ये त्यांनी मेटारायझियम या कीडनाशक बुरशीचा वापर करून हुमणी अळीचे नियंत्रण कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुरवडी येथे वास्तव्य करत असून अनेक प्रयोगांनी व प्रात्यक्षिकांनी त्या गावकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत आहेत.

या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषी कन्या सायली आकोटकर, शिवांजली डोंबाळे, नेहा गुंड ,श्रुती होनकळस,  रिचा कुरडे, सुमेदा माने, प्रांजली पत्रे यांनी केले. या प्रात्यक्षिकाच्या वेळी उपसरपंच विजय खवळे,रणजीत साळवे, सुनील निंबाळकर तसेच गावाचे इतर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी कृषी महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक एस. पी .गायकवाड, प्राध्यापक एस. व्ही. बुरुंगळे आणि प्राध्यापक एस के दळवे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.