फलटण चौफेर दि २०
साखरवाडी ता फलटण गावामध्ये सुमारे १८ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या युगपुरुष छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा उद्या बुधवार दिनांक २१ रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती साखरवाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व फलटण संस्थानाचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे तीनही राजे एकाच व्यासपीठावर येणार आहेत साखरवाडी ग्रामपंचायतच्या आवारात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढी पुतळाचे अनावरण उद्या या तीनही राजांच्या हस्ते होणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे असणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण कोरेगावचे आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती राहणार असून साखरवाडी सह पंचक्रोशीतील शिवभक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे