फलटण चौफेर दि २०महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , कोल्हापूर विभागामार्फत आयोजित केलेल्या एच.एस.सी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2024 ची कॉमर्स व किमान कौशल्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे.मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण केंद्र क्रमांक 0104 मध्यें कॉमर्स शाखेच्या X097812 ते X098291 व किमान कौशल्य शाखेच्या X114966 ते X115153 हे बैठक क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे एच.एस.सी बोर्डाच्या वेळापत्रका प्रमाणे सर्व विषयाचे पेपर होतील याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्र ( रिसीट ), ओळखपत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमणध्वनी ( मोबाईल) , टॅबलेट , इलेक्ट्रॉनिक घड्याळ वा तत्सम बोर्डाने बंदी घातलेली साधने किंवा उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे .
विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केंद्रसंचालक श्री. वेदपाठक संजय यांनी केले आहे.