Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण शहरात ३ जून रोजी वीजपुरवठा खंडित राहणार



फलटण चौफेर दि ३ जून २०२५

आज दि ३रोजी (मंगळवार) फलटण शहर व परिसरातील वीजपुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे काही तास खंडित राहणार आहे. 220KV कोळकी EHV महापारेषण उपकेंद्र तसेच 22KV फलटण फिडरवरील देखभाल व लाईन मेंटेनन्सची कामे यासाठी नियोजित करण्यात आली आहेत.

महापारेषणकडून सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. परंतु महावितरणकडून ही कामे दुपारी ४.३० ते सायंकाळी ५वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्यामुळे वीजपुरवठा त्यानंतरच पूर्ववत होईल, अशी माहिती महावितरणने दिली आहे.


या काळात फलटण शहर, जाधववाडी व आजूबाजूच्या परिसरात वीजपुरवठा बंद राहील. कामे वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.महावितरणने सर्व ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.