फलटण चौफेर दि ५ जून २०२५
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक तयारी केली असून, सर्व आवश्यक सुविधा व सोयी उपलब्ध करून देण्याचा निर्धार जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी व्यक्त केला आहे.
काल दि ४ रोजी लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गावर पालखीतळांची पाहणी जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, सुरवडीचे माजी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील व पोलीस पाटील संतोष पवार हे सुरवडी गावातील पालखी तळाच्या पाहणीवेळी उपस्थित होते.
सुरवडी येथील पालखीतळाची पाहणी करताना तुषार दोशी यांनी वाहतुक व सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. ते म्हणाले, “पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा गौरवशाली भाग आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत म्हणून प्रत्येक विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.”