फलटण चौफेर दि.२० महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ ,मुंबई यांच्या मार्फत नोव्हेंबर मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम सत्राचा निकाल शंभर टक्के लागला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एन.जी. नार्वे यांनी दिली. चारही पदविका अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के लागणारे हे सातारा जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याचेही त्यांनी सांगितले.डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये प्रथम क्रमांक संयुक्तपणे कु. जाधव देवराज प्रकाश व कु. जाधव प्रतीक्षा महेंद्र(८३.१८℅),तर कु. जाधव आर्या महिंद्र व कुमारी ठोंबरे श्रुती बापू या विद्यार्थिनींनी(८२.४७℅ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकविला. तर तृतीय क्रमांक कु.भोजने रिद्धी दत्तात्रेय व थोरात सत्यम दत्तात्रेय यांनी ८२.३५℅ गुण मिळविले. विशेष म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग चाही निकाल शंभर टक्के लागला असून त्यामध्ये कु.पवार रसिका नंदकुमार हिने ८०.७१ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक कु. कदम श्रुती बबन हिने ८०.५९ गुण मिळून पटकावला.तसेच कु. ननावरे विशाल किसन याने तृतीय क्रमांक पटकावला. सिव्हिल इंजनिअरिंग मधील कु. घनवट अवधूत हरिदास हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.तर कु. जाधव गणेश हनुमंत व कु पटेल देव हरीश यांना द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. इलेक्ट्रॉनिकस आणि टेलिकम्युनिककेशन इंजिनिअरींग या ब्रांच मधून कु. मंजुळे तन्मय अजय याने ८१.६५ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळविला तर टेंबरे सृष्टी तानाजी हिने ८१.१८ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.तसेच कु. धापटे सुमित श्रीकांत याने तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एन.जी. नार्वे , विभाग प्रमुख प्रा.एस. टी. काळे आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,सर्व कॉलेज कमिटी सदस्य , प्रशासन अधिकारी मा.श्री . अरविंद निकम सर ,प्राचार्य प्रा. डॉ.एन .जी . नार्वे सर यांनी केले.