फलटण चौफेर दि २०
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत की जेवढे ही रेकॉर्डवरील फरारी व पाहिजे आरोपी आहेत ते चेक करून जास्तीत जास्त आरोपींना अटक करावी या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली. पोलीस हवालदार शांतीलाल ओमासे पोलीस नाईक तात्या कदम पोलीस अंमलदार अमोल जगदाळे. दडस नितीन चतुरे यांची टीम तयारी केली आहे.पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये दिनांक २० फेब्रुवारी रोजी पहाटे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले त्यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड वरील फरार आरोपी बंद कुलिया उर्फ गोविंद भगवान काळे वय ७०, लाकड्या भगवान काळे वय ३० वर्ष व पिंगा पुण्या काळे वय ३५ वर्ष राहणार सोनवडी तालुका फलटण हे त्यांच्या राहत्या घरी मिळून आले व गेली सहा वर्षांपासून ते फरारी असल्याने त्यांना पोलीस ठाण्यास आणून सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
याही पुढे फलटण ग्रामीण पोलिसांतर्फे पाहिजे व फरारी आरोपींचा कसोटीने शोध घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले