नवगतांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ या प्रारंभ १५ जून पासून झाला असून त्यानिमित्ताने साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात 'शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत' कार्यक्रम साखरवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच रेखाताई जाधव यांचे शुभहस्ते व ग्रामपंचायत सदस्या सुषमाताई गाडे, गौरीताई औचरे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उर्मिलाताई जगदाळे, पर्यवेक्षक तुळशीदास बागडे आणि विद्यालयातील सर्व, शिक्षक - शिक्षकेतर बंधु भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, बहुसंख्य पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाबपुष देऊन विदयार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच ५ वी ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पुस्तकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका सौ जगदाळे यांनी शाळेच्या एकंदर प्रगतीची माहिती सर्व उपस्थितांना दिली. यामध्ये मार्च २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी शालांत परीक्षेचा निकाल ९६.१३ टक्के लागला असून परीक्षेस बसलेल्या २०७ पैकी १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कुमारी सरगर जान्हवी मिलिंद (९५.६०%), कुमारी मामडाल वैष्णवी गणेश (९२.६०%) आणि कुमार ओम प्रल्हाद बोंद्रे (९२.४०%) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवलेले आहेत, विद्यालयात सातत्याने सर्व स्पर्धा परीक्षा, विविध क्रिडा प्रकार इत्यादींसाठी जादा वेळ देऊन मार्गदर्शन केले जाते. उत्कृष्ठ निकालांसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधुभगिनी अहोरात्र प्रयत्नशील असतात. संस्थेचे पदाधिकारी प्रल्हादराव साळुंखे-पाटील, धनंजयदादा साळुंखे-पाटील, राजेंद्र शेवाळे,राजेंद्र भोसले, कौशल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय सतत गौरवशाली वाटचाल करीत असून चालू शैक्षणिक वर्षासाठी शाळेचे विक्रमी पटनोंदणी झाल्याचे सौ जगदाळे यांनी आवर्जुन सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक हरिदास सावंत सर यांनी केले.