साखरवाडी(गणेश पवार)आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या नियमबाह्य व धोकेदायक कामामुळे दोन तरुणांना जीव गमवावा लागला असून याप्रकरणी आर.के.सी कंपनी व उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांच्या विरोधात गुरुवारी फलटणकरांनी मोर्चा चे आयोजन केले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग या चौपदरी रस्त्याचे काम करणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी ने तांबमळा येथील दूध संघ ते वडजल येथील फलटण कडून लोणंद कडे जाणाऱ्या एका बाजूकडील काम अनेक दिवसापासून संथपणे सुरू होते असून लोणंद फलटण कडील बाजूकडे एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू होती या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आले नव्हते दोन्ही बाजूकडील वाहतुकीच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा तात्पुरता दुभाजक लावण्यात आला नसल्याने या रस्त्यावर भरदाव वेगाने वाहतूक सुरू होती.
दिनांक १५ रोजी रात्री तांबमळा येथील गुरू हॉटेलचे पुढे आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या सूर्यस्ता नंतरही मुरूम वाहतूक करणाऱ्या दहा चाकी टिपर ने फलटण येथील दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना दिलेल्या धडक देत फरपटत नेहत अपघात केला यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. फलटण येथील दोन तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप तसेच तहसिलदार समीर यादव यांच्या विरोधात फलटणकरांनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १८ रोजी सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन मंगळवार पेठ फलटण येथून, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत कार्यालय) पर्यंत सदरचा मोर्चा निघणार आहे. याबाबत फलटण शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे