साखरवाडी (गणेश पवार) कोळकी येथील निरा उजवा कालवा मध्ये एका वृध्द महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास जलशुद्धीकरण केंद्र कोळकी व निरा उजवा कालवा यांच्या मध्ये भरावा वर एका वृध्द महिला बुडून मृत पावली याबाबत फिर्यादी ज्ञानदेव धनसिंग परकाळे ( मुळ रा. अंजणगाव ता. बारामती जि. पुणे हल्ली माळेगाव ता. बारामती जि. पुणे) यांची बहिण गजराबाई हणमंत निंबाळकर ( वय 67 वर्षे तांबमळा, फरादवाडी ता. फलटण जि.सातारा) या मानसिक रुग्ण असल्याने व ती सतत बडबड करत असल्याने तिने वेड्याच्या भरात कॅनॉल मध्ये उडी टाकुन पाण्यात पडुन बुडुन मयत झाली आहे अशी फिर्याद ज्ञानदेव धनसिंग परकाळे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.