Type Here to Get Search Results !

शैक्षणिक ,महसूल व इतर विभागातील शेतकरी व विद्यार्थीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी 6 मे रोजी खा रणजितसिंहांकडून आढावा बैठकीचे आयोजन aayojan

 


साखरवाडी (गणेश पवार)

शैक्षणिक, महसूल व इतर विभागातील शेतकरी व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी दिनांक 6 मे रोजी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून संबंधित तक्रारी जागेवरच सोडवण्यासाठी बैठक आयोजित केली असल्याची माहिती प्रदेश कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे यांनी दिली असून त्यानुसार महसूल विभाग तसेच शैक्षणिक व इतर विभागातील शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्या जागेवरच सोडवण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे  खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आढावा बैठक आयोजित केली असून सर्वांनी आपल्या तक्रारी व  अडचणींचा निपटारा करण्यासाठी शनिवार दि.6 मे रोजी सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे यांनी केले आहे.

    दरम्यान गेली अनेक वर्षे महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना विनाकारण सहज होणाऱ्या कामांना हेलपाटे मारायला लावले असल्याच्या अनेक तक्रारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी व तोंडी केल्या होत्यातसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्या मुळे फलटण तालुक्यातील सर्व नायब तहसिलदार, सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांना या आढावा बैठकीत हजर राहण्याचे आदेश तहसीलदार समीर यादव यांनी काढला असून जो हजर राहणार नाही त्याचेवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

     खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झालेपासून विविध विभागांच्या अधिकाधिक अडचणी सोडविल्या असून सध्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत, मात्र "सरकारी काम आणि सहा महिने थांब"अशी सवय असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनागोंदी कारभार सुरू केला असून शेतकरी अनेक लाभांपासून वंचित राहतात, तसेच शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते मात्र त्यांना वेळेत ती उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी फिसह अनेक गोष्टींपासून वंचित राहतात त्या मुळे शेतकरी व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खासदार रणजितसिंह स्वतः आढावा घेऊन त्या गोष्टी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यासाठी सर्व शेतकरी व विद्यार्थ्यांनी या आढावा बैठकीला उपस्थित राहावे असे शिंदे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.