विडणी -(योगेश निकाळजे) = बुध्दपौर्णिमेनिमिताने विडणी येथील संघमित्र तरुण मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विडणी ता.फलटण येथील संघमित्र तरुण मंडळाच्यावतीने शुक्रवार दि. 5 मे रोजी बौद्धनगरमधील तक्षशिला बुद्धविहारात बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात येणार असून सकाळी 8 वाजता सामुदायिक बुध्दवंदनेचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे, यावेळी उपस्थितांना खीरदान करण्यात येणार असून दुपारी 12 नंतर भव्य अन्नदानाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी 7 वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध व बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांची गावातून सवाद्य भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे, या कार्यक्रमास खास कोळळी येथील श्रामणेर शिबिरातील भंतेवर्ग मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघमित्र तरुण मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.