फलटण चौफेर दि २ जून २०२५
तडवळे ता फलटण गावातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असलेले प्रशांत चंद्रकांत खराडे यांची तडवळे गावाच्या सरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रशांत खराडे हे कै. नानासो खंडेराव खराडे (आबा) आणि कै. गजराबाई नानासो खराडे (ताई) यांचे नातू आहेत. या कुटुंबाने गावात गोरगरीब, भुकेल्या जनतेची सेवा करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ताई यांनी आपल्या हातून कोणालाही उपाशी परत जाऊ दिले नव्हते, अशी आठवण गावकरी आजही कृतज्ञतेने सांगतात.सरपंचपदी निवडीनंतर प्रशांत खराडे यांनी गावात अजून व्यापक विकासकामे हाती घेण्याचा संकल्प व्यक्त केला. या निवडीनंतर भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेल तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.