साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी विद्यालय (माध्यमिक) विभागामध्ये मध्ये सन 19 98/99 च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विद्यालयास 9 लाकडी खुर्च्या भेट म्हणून दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील,संचालक राजेंद्र शेवाळे, कौशल भोसले व मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी विद्यार्थी उदयसिंह कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना, विद्यालयाने आम्हाला भरभरून ज्ञान दिल्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहोत या ऋणातून कधीही आम्हाला मुक्त होता येणार नाही, मात्र काही प्रमाणामध्ये शाळेला मदत करण्याचा आमचा हेतू आहे, या उद्देशानेच आम्ही माजी विध्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेसाठी ही छोटीशी भेट दिल्याचा आनंद आम्हाला होत असल्याचे म्हटले.मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला देऊ केलेल्या खुर्च्या बद्दल विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले, साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानून त्यांनी देऊ केलेल्या खुर्च्या स्वीकारल्या आणि भविष्यात शाळेचे बाह्य अंतरंग बदलण्याचा उद्देश व्यक्त केला. यावेळी अंकुशकुमार वाघ,उदयसिंह कांबळे,सुमीत धायगुडे,सुरेश जावळे, धनंजय जाधव,किसन गोरगल ,मोनिका केसकर, राजू देशपांडे, विजय निंबाळकर, सचिन धोत्रे, संतोष हारोली , धनंजय पंडीत , अनिकेत अटक शाळेचे पर्यवेक्षक तुळशीदास बागडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचालन सुनिल भोसले यांनी केले.