फलटण चौफेर दि ५ डिसेंबर २०२५ : मागील आठ दिवसांपासून खंडित झालेला नीरा उजवा कालव्याचा पाणी पुरवठा अखेर उद्या दि. ०६ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होणार असल्याची माहिती आमदार सचिन पाटील यांनी दिली.फलटण पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने ते सातत्याने आमदार सचिन पाटील यांच्याकडे मागणी करत होते. दरम्यान, नीरा उजवा कालव्याच्या अस्थरीकरणाचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची वाढती अडचण लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत कालव्याचे अभियंता श्री. मोरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.या चर्चेनंतर तातडीने पाणी सोडण्याबाबत आदेश देण्यात आले असून नीरा उजवा कालव्याचा पाणीपुरवठा उद्यापासून पुनरुज्जीवित करण्यात येणार असल्याचे अभियंता मोरे यांनी मान्य केले आहे.शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत वेळेत केलेल्या या पाठपुराव्यामुळे पुढील सिंचन हंगामासाठी दिलासा मिळणार आहे.

