फलटण चौफेर दि ४ डिसेंबर २०२५
सालाबादप्रमाणे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, लोणंद येथे श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सवाचा धार्मिक सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी हा उत्सव संपन्न होणार असून या पवित्र दिवशी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजक समितीतर्फे करण्यात आली आहे.कार्यक्रमानुसार दुपारी ठीक १२.०० वाजता श्री गुरुदेव दत्त महाराजांची आरती व पुष्पवृष्टी होणार असून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद दुपारी १२ नंतर ते ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे.उत्सवाचे स्थळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, लोणंद – निरा-सातारा रोड येथे असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

