फलटण चौफेर दि २२ नोव्हेंबर २०२५
फलटण तालुक्यातील ऊस दरातील सुरू असलेली कोंडी सर्वप्रथम श्रीराम जवाहर साखर कारखान्याने फोडली आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी (ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण) यांनी २०२५-२६ या गळीत हंगामासाठी प्रतिटन ₹३३०० ऊसदर जाहीर केला आहे.
एफआरपीप्रमाणे दर ₹३००९ निश्चित असताना कारखान्याने २९१ रुपये अतिरिक्त देत ऊसदर ₹३३०० करण्याचा निर्णय घेतला आहे. गाळपानंतर १५ दिवसांत प्रतिटन ₹३२०० एकरकमी तर दिवाळी सणासाठी ₹१०० विशेष रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामागे कल्लाप्पाण्णा आवाडे, मंत्रिमंडळातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, प्रकाश आवाडे आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरयांचा पुढाकार असल्याचे सांगण्यात आले.या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस उत्पादकांना ऊस घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

