फलटण चौफेर दि २८ नोव्हेंबर २०२५
: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फलटण शहरातील गजानन चौक येथे आज दुपारी दोन वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत शिवसेना (शिंदे गट) फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते फलटणमध्ये येत आहेत यावेळी अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाबाबत तालुका व शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सभेला अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.उद्याच्या फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.या सभेत उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, याचे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेर सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचे अनिकेत राजे नाईक निंबाळकर असा थेट सामना होत असल्याने ही सभा अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे


