फलटण चौफेर दि २६ ऑक्टोबर २०२५
फलटण येथे महायुती आयोजित “कृतज्ञता मेळावा व विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा” या भव्य कार्यक्रमात ग्रामपंचायत सुरवडी (ता. फलटण) ग्रामपंचायतला “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.हा सन्मान सुरवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शरयू जितेंद्र साळुंखे-पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ना. जयकुमार गोरे (मंत्री, ग्रामविकास विभाग), ना. शंभूराज देसाई (मंत्री, राज्य उत्पादन शुल्क व पालकमंत्री, सातारा जिल्हा), ना. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग), तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील आमदार सचिन पाटील,मनोज घोरपडे,अतुल भोसले,राहुल कुल यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते.सुरवडी ग्रामपंचायतीने ग्रामविकास, स्वच्छता, जलसंवर्धन, हरितग्राम, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल ग्रामपंचायत या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उपक्रमांमुळे सुरवडी ग्रामपंचायतने तालुक्यात आणि जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.
सन्मान स्वीकारल्यानंतर सरपंच सौ. शरयू साळुंखे-पाटील म्हणाल्या,“हा पुरस्कार माझ्या ग्रामस्थांचा, ग्रामपंचायत सदस्यांचा आणि प्रशासनाच्या सहकार्याचा सन्मान आहे. ग्रामविकासाच्या दिशेने सुरवडी गाव आणखी वेगाने वाटचाल करेल, हेच आमचे ध्येय आहे.”


