Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री फडणवीस आज फलटणमध्ये; विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि जाहीर सभा

 


साखरवाडी (पुढारी वृत्तसेवा)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे आज दि २६  रोजी सकाळी १२.३० वाजता पार पडणार आहेत. या कार्यक्रमाची मुख्य जाहीर सभा यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली असून, या दौऱ्याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष ना राधाकृष्ण विखे पाटील असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई, बांधकाममंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


 तसेच सातारा जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदार, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाबाबत माहिती देताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, या कार्यक्रमाबाबत माहिती देताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नीरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. तसेच पाडेगाव-साखरवाडी रस्ता, दहिवडी-फलटण रस्ता या महत्त्वाच्या रस्त्यांचे शुभारंभ होणार आहेत.याशिवाय फलटण शहरातील नवीन उपजिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी व मंडळ कार्यालय बांधकामांचे भूमिपूजन, बाणगंगा नदी स्वच्छता प्रकल्प, निरा उजव्या कालव्याचे सुशोभीकरण, सेशन कोर्ट, महसूल भवन अशा अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या नव्या इमारतींचे उद्घाटन तसेच नाईकबोंबवाडी एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात अधिकारी व उद्योगपतींची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. फलटणच्या विकासासाठी मुख्यमंत्री कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा करण्याची शक्यता असून, साखरवाडी येथे अप्पर तहसील कार्यालय व पोलीस निरीक्षक नियुक्तीबाबत घोषणाही अपेक्षित आहे


.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.