Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोणंद पोलीसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व दुचाकी चोरी करणारे सराईत जेरबंद

 



फलटण चौफेरदि. ११ सप्टेंबर २०२५

लोणंद पोलिसांनी घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयतांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल सात दुचाकी व चांदीचे दागिने असा एकूण सुमारे ४ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.रवि भास्कर पवार (वय २८, रा. सागर कॉलनी, पाथरी, जि. परभणी) व अतुल आदमन शिंदे (वय ३०, रा. पाडेगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशितांची नावे आहेत

याबाबत लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार दि. २४ ऑगस्ट रोजी लोणंद शहरातील माऊलीनगर येथे घरफोडी करून चांदीचे साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी  यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल भोसले यांनी पथक तयार केले.गोपनीय बातमीदाराकडून संशयित लोणंद परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या अटकेनंतर पुढील तपासात त्यांनी पुणे शहरासह इतर भागांतून एकूण सात मोटारसायकली चोरी केल्याचे समोर आले.पोलिसांनी संशयीतांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने त्यांची ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. आणखी गुन्हे केले आहेत काय, याबाबत तपास सुरू आहे.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रोहीत हेगडे, विजय पिसाळ, विष्णु धुमाळ, हवालदार नितीन भोसले, राहुल मोरे, रतनसिंह सोनवलकर, सतिश दडस, बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, जयवंत यादव, संजय चव्हाण आदींनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास पोहवा राहुल भोरे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.