Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संभाजी पवार (आप्पा) यांचे आकस्मिक निधन



फलटण चौफेर दि ५ ऑगस्ट २०२५

एस.टी. महामंडळात दीर्घकाळ निस्वार्थी सेवा बजावणारे, अत्यंत प्रेमळ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ चालक कै. श्री. संभाजी मारुती पवार (आप्पा) वय ६९ रा सुरवडी ता फलटण यांचे दि ४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबासह मित्रपरिवार व गावकरी मंडळींमध्ये शोककळा पसरली आहे.कै. संभाजी पवार हे आपल्या सेवाकाळात स्वारगेट ते पंढरपूर या मार्गावर कायमस्वरूपी कार्यरत होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि अपघातविरहित सेवा देणारे चालक म्हणून ते ओळखले जात. निर्व्यसनी स्वभाव, सुसंवादप्रियता आणि सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ही त्यांची विशेष वैशिष्ट्ये होती. त्यांनी अपघाताविना सेवा पूर्ण करून निवृत्ती मिळवली.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे फलटणचे  तालुकाप्रमुख धारकरी महेश पवार यांचे ते वडील असून त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, मुले, नातवंडे व पत्नी असा परिवार आहे त्यांचा सावडणे विधी उद्या दि ६ रोजी सकाळी ८ वाजता सुरवडी येथील मशानभूमीत होणार आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.