फलटण चौफेर दि ५ ऑगस्ट २०२५
राशीन ता कर्जत येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक या नामफलकाची तोडफोड व विटंबना काही स्थानिक समाज कंटकानी केली असून या घटनेचे तीव्र पडसाद फलटण येथे पहायला मिळाले या घटने विरुद्ध फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती , महात्मा फुले जयंती उत्सव समिती फलटण तालुका मुस्लिम समाज यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी फलटण यांना निवेदन देण्यात आले आहे या वेळी शेकडो ओबीसी बांधव एकत्र येत झालेल्या निंदनीय घटने विरुद्ध निदर्शने करण्यात आली
राशीन येथील घटने बरोबरच वीर ता पुरंदर येथील ओबीसी युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला राशीन येथील नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कायदेशीर कारवाई झाली पाहिजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना दडपण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटतील असे निवेदनात फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने नमूद केले आहे या वेळी बापूराव शिंदे नंदकुमार नाळे भाऊ गोविंद भुजबळ मुनिष जाधव पिंटू इवरे आमिर भाई शेख दत्ता नाळे विकास नाळे संदीप नेवसे रणजीत नाळे अमोल रासकर अमोल शिंदे ऋषिकेश काशीद डॉ रणजित बनकर बापूराव बनकर बाळासाहेब ननावरे ऋषिकेश शिंदे बंडू शिंदे शनेश शिंदे रोहन शिंदे प्रवीण फरांदे विजय शिंदे दीपक शिंदे किरण राऊत बाळासाहेब घनवट किरण पखाले शेखर शिंदे ज्ञानेश्वर अडसूळ प्रथमेश शिंदे अजय भुजबळ अमरदीप भुजबळ रमेश नाळे शिवाजी भुजबळ प्रदीप ननवरे योगेश शिंदे तुषार करणे रणजीत बनकर रामदास शिंदे दिनेश शिंदे अभिजीत शिंदे भीमराव जाधव ऋतिक नानावरे विक्रम पखाले किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती