Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडी येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर व ‘इक्षुदंड एम.डी. क्लिनिक’चे उद्घाटन



फलटण चौफेर दि. १४ ऑगस्ट २०२५– साखरवाडी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी साखरवाडी एस.टी. स्टँडजवळील ‘इक्षुदंड एम.डी. क्लिनिक’ या नव्या दवाखान्याचे उद्घाटन होणार आहे.


हे शिबिर यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय.सी.यू., खामगाव, साखरवाडी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय येथे भरविण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभ माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर व फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील (तात्या), महानंद डेअरी मुंबईचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, माजी सभापती शंकरराव माडकर, साखरवाडी सरपंच सौ. अपर्णा बोडरे, उपसरपंच विक्रम ढेंबरे, माजी सरपंच सुरेश भोसले, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन भोसले, खामगावचे उपसरपंच राहुल सोनटक्के,  सरपंच सौ. अर्चना जगताप,सुरवडी सरपंच सौ. शरयु साळुंखे पाटील व उपसरपंच सूर्यकांत पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत शिबिरामध्ये सर्व प्रकारचे सिटीस्कॅन, रक्तातील साखर, फुफ्फुस क्षमता, रक्तदाब, रक्तातील पेशी, लघवी तपासणी, लिव्हर तपासणी, हाडांची तपासणी, किडनी तपासणी यांसह विविध निदान चाचण्या मोफत होणार आहेत. तसेच हृदयरोग व छातीचा एक्स-रे तपासणीवर ३० टक्के सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती डॉ. विश्वनाथ चव्हाण (एम.डी. मेडिसिन, डिप्लोमा इकोकार्डिओग्राफी) व डॉ. बाळासाहेब राऊत (डी. ऑर्थोपेडिक सर्जन) यांनी दिली.‘इक्षुदंड एम.डी. क्लिनिक’चे उद्घाटन सायं. ५.३० वाजता पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.