फलटण चौफेरदि. १४ ऑगस्ट २०२५
साखरवाडी येथील वीरेंद्र जाधव आणि जाधव परिवार स्थापीत रत्नबन प्रतिष्ठान तर्फे दिल्या जाणाऱ्या "रत्नबन शिष्यवृत्ती"चे वाटप आज साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या सलग चौथ्या वर्षी आयोजित शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात एकूण सहा विद्यार्थ्यांना रु. १२,००० ची रोख रक्कम, विशेष स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या वर्षी शिष्यवृत्तीचा मान कुमारी वैष्णवी खरात, स्नेहा सावळकर, आर्या बोंद्रे, प्रज्ञा पवार, दुर्वा कदम आणि निशा आवळे यांना मिळाला. साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. उर्मिलाताई जगदाळे (सचिव, साखरवाडी शिक्षण संस्था व माध्यमिक विभाग प्रमुख) होत्या. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र जाधव, उपाध्यक्ष विनोद जाधव, सचिव हरिदास सावंत, जाधव परिवारातील बबनराव जाधव, सौ. रत्नमालाताई जाधव, सौ. रेश्माताई जाधव तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप चांगण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमात साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या वतीने प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी आपल्या भाषणात जाधव परिवाराच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.