फलटण चौफेर दि १२ ऑगस्ट २०२५
साखरवाडी बाजारपेठ येथील श्री चंद्रकांत बाजीराव बोंद्रे (वय ७१) हे दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.२५ वाजता “आईस्क्रीम खाऊन येतो” असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाहीत.नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी तसेच सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही. सदर प्रकरणाची नोंद ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण येथे करण्यात आली आहे.श्री बोंद्रे यांचा रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच, केस पांढरे, मध्यम बांधा, गळ्यात माळ, अंगात पांढरा शर्ट व पायजमा असा पेहराव आहे.
कोणास सदर व्यक्ती आढळल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 श्री राहुल चंद्रकांत बेंद्रे – ९९७५६०६१६८
📞 सौ. सिंधू चंद्रकांत बोंद्रे – ९५६१९२८१३१