फलटण चौफेर, दि. १२ ऑगस्ट २०२५
निरा खोऱ्यात गेल्या २४ तासांत तुरळक पावसाची नोंद झाली असून, सकाळी सहा वाजेपर्यंत केवळ ०.१३१ टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग नोंदवला गेला. तरीही चारही धरणांचा एकत्रित पाणीसाठा ४४.९८७ टीएमसी म्हणजे ९३.०८ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी साठा ४७.४१८ टीएमसी म्हणजे ९८.१२ टक्के होता.
भाटघर धरणात १ मि.मी. पाऊस नोंदवून २३.०८७ टीएमसी (९८.२३%) पाणीसाठा असून ४५ क्यूसेक पाण्याची वाढ झाली आहे. निरा देवघर धरणात २ मि.मी. पावसाने १०.८३३ टीएमसी (९२.३६%) साठा असून २४ क्यूसेक पाण्याची भर पडली आहे. वीर धरणात पाऊस झालेला नसून ८.३७२ टीएमसी (८८.९९%) साठा आहे व ६२ क्यूसेक पाण्याची वाढ झाली आहे. गुञ्जवणी धरणात ९ मि.मी. पाऊस होऊन साठा २.६९४ टीएमसी (७३.०१%) इतका आहे.कालव्यांमधून पाणीपुरवठा सुरु असून, निरा डावा कालव्यामधून ७७५ तर उजवा१०५६ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.