साखरवाडी(किसन भोसले)
लक्ष्मीतरु चे झाड हे जगातल्या मानव जातीला एक वरदानच आहे असे पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक प्रभाकर जगताप यांनी सांगितले साखरवाडी तालुका फलटण येथील सरदार वल्लभभाई हायस्कूल येथील सर्व विद्यार्थ्यांना लक्ष्मी तरु झाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रभाकर जगताप हे या झाडां विषयी माहिती सांगताना ते बोलत होते यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन नितीन शा. भोसले स्कूल कमिटी अध्यक्ष बापूसाहेब नाईक निंबाळकर उद्योजक संजय भोसले हायस्कूलचे प्राचार्य गोपाळ जाधव सामाजिक कार्यकर्ते दिलीपबाबा पवार पत्रकार किसन भोसले दादा जाधव हिंदुराव वारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते जगताप म्हणाले की अमेरिकेसारख्या देशाने या झाडाला आपले राष्ट्रीय झाड म्हणून जरी संबोधले असले तरी याचा मूळ वंश भारतात सापडतो म्हणून कॅन्सर मुक्त भारत अभियाना मध्ये लक्ष्मी तरु हे झाड अत्यंत उपयुक्त असून भारतातील कॅन्सरच्या रुग्णांना या झाडापासून चांगलीच मुक्ती मिळते आज काल गावा गावात कॅन्सरचे रुग्ण सापडायला लागले असून प्रत्येकाने आपल्या शेतात व घरासमोर या झाडांची लागवड केली तर आपण कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देऊ शकतो या झाडांच्या पाल्या पासून तेल निर्मिती करता येते प्रत्येकाने २० झाडे जरी जगवली तरी वर्षभर पुरेल एवढे तेल या झाडापासून मिळते लक्ष्मी तरु हे झाड दम्याच्या रुग्णांना आराम देते या झाडापासून साबण बनवता येतो डायबेटीस रुग्णांना तर या झाडापासून चांगलाच फायदा होतो असेही प्रभाकर जगताप यांनी सांगितले ते म्हणाले की या झाडांच्या बियापासून डायबेटिस रुग्णांना औषध तयार होते विशेषतः पोटाच्या आजारावर याचा खूप उपयोग होतो एक ना अनेक आयुर्वेदिक औषधे रोजच्या दैनंदिन जीवनात लागणारे पदार्थ लक्ष्मीतरू आपल्याला देत असते या झाडाला ७० वर्षे आयुष्य असून दोन वर्षापासून प्रत्यक्षपणे उत्पन्न मिळाला चालू होते म्हणून झाड म्हणते मला तुम्ही दोन वर्षे जगवा मी तुम्हाला सत्तर वर्षे जगवतो असेही प्रभाकर जगताप यांनी निदर्शनात आणून दिले या झाडाची आयुर्वेदिक साथ मानवाला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकाने किमान एक तरी लक्ष्मीतरुचे झाड लावले पाहिजे असेही त्यांनी शेवटी सांगून विद्यार्थ्यांच्या समवेत झाडे लावा झाडे जगवा असा नारा प्रभाकर जगताप यांनी यावेळी दिला प्रभाकर जगताप हे जेथे जातील तेथे झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत असतात जगताप म्हणतात समाजाने अनर्थक गोष्टींवर पैसे खर्च करण्यापेक्षा लक्ष्मी तरु या झाडावर पैसे खर्च केले तर माणसाचे जीवनमान भविष्यात उंचवल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त करून ते म्हणाले माझ्या नर्सरीमध्ये हजारो या झाडांची निर्मिती केली जाते पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन या ठिकाणी प्रभाकर जगताप यांची रोपवाटिका असून लक्ष्मीतरु च्या झाडांसाठी ९६०७२३५९३६ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे सरदार वल्लभाई हायस्कूलचे शिक्षक रवींद्र टिळेकर व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर यांनी आपल्या स्वखर्चातून लक्ष्मी तरु झाडांचे वाटप यावेळी विद्यार्थ्यांना केल्याची माहिती शाळेचे प्राचार्य गोपाळ जाधव यांनी दिली या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन रवींद्र टिळेकर यांनी केले होते.