Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आपली फलटण मॅरेथॉन २०२५साठी नोंदणीला सुरुवात डॉ. प्रसाद जोशी यांची माहिती

 



फलटण चौफेर दि ३ ऑगस्ट २०२५

  जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण यांच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित होणाऱ्या ‘आपली फलटण मॅरेथॉन’ या उपक्रमाचे यंदाच्या वर्षीचे आयोजन १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येणार आहे. मॅरेथॉनच्या नोंदणीस अधिकृतपणे सुरुवात झाली असून ही माहिती डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.यावर्षी मॅरेथॉन “Support Organ Donation” या संकल्पनेवर आधारित असून, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त श्रीमती मीरा बोरवणकर या प्रमुख पाहुण्या आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून उपस्थित राहणार आहेत.


जोशी हॉस्पिटलतर्फे २०१५ पासून सलग ९ वर्षे ही मॅरेथॉन आयोजित केली जात असून, यामार्फत निरोगी शरीर, व्यायामाचे महत्त्व आणि सामाजिक जनजागृती साधली जाते. १२ ते ८५ वयोगटातील नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरणात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यंदा पहिल्यांदाच २१ किमी अंतराच्या धावण्याच्या शर्यतीचा समावेश करण्यात आला आहे.गुडघा आणि खुबे यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या १००० हून अधिक रुग्णांसाठी ३ किमी अंतराची वॉकेथॉन, मुलांसाठी फन रन आणि ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे. मॅरेथॉनचा मार्ग निसर्गरम्य असून, ऊसशेती, फळबागा व द्राक्षमळ्यांतून जातो. झुंबा वॉर्मअप आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही यावेळी होणार आहेत.


नोंदणीसाठी शुल्क पुरुषांसाठी ७५० रुपये, महिलांसाठी ५०० रुपये, १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ३०० रुपये असून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी विनामूल्य आहे. नोंदणीसाठी alpharacingsolution.com या संकेतस्थळावर किंवा QR कोड स्कॅन करून करता येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत आहे.मॅरेथॉन किटमध्ये आकर्षक टी-शर्ट, बिबसह टाइम चिप, टोपी, एनर्जी बार आणि सरप्राइज गिफ्ट दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट व स्मृतिचिन्ह दिले जाणार असून प्रत्येक गटात पुरुष व महिला गटासाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.डॉ. प्रसाद जोशी यांनी फलटणकरांनी आरोग्यासाठी एकत्र येत या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.