फलटण चौफेर दि १६ ऑगस्ट २०२५
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भिलकटी गावचे पोलीस पाटील शांताराम विठ्ठल काळेल यांचा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
भिलकटी, फडतरवाडी आणि जिंती अशा तीन गावांची पोलीस पाटील म्हणून जबाबदारी सांभाळत असताना, काळेल यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल हा विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील गावांमध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे.या सन्मानाबद्दल पोलीस पाटील शांताराम काळेल यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक,
साखरवाडी दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. दीपक पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच, निवृत्त नायब तहसीलदार भोईटे साहेब आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनीही त्यांच्या यशाचे कौतुक केले.पोलीस पाटील संघटनेकडूनही त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला. सातारा जिल्हा पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब गायकवाड, कार्याध्यक्ष महेश शिंदे पाटील, उपाध्यक्ष वडजल गावचे पोलीस पाटील श्री. विजयकुमार ढेंबरे आणि मार्गदर्शक श्री.दत्तात्रय सरक पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. फलटण तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष राजळे गावचे पोलीस पाटील श्री.महेश शेडगे आणि सचिव खडकी गावचे पोलीस पाटील श्री.गणेश कारंडे पाटील यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.