फलटण चौफेर दि १६ ऑगस्ट २०२५
लोणंद पोलीस ठाण्यात सार्वजनिक शांततेचा भंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोणंद ते शिरवळ जाणाऱ्या रस्त्यावर अग्रवाल स्वीट होमजवळ अमर अशोक चव्हाण (वय २८, रा. तरडगाव, ता. फलटण) हा टाटा कंपनीची “मोरया” असे लिहिलेली साऊंड सिस्टम लावलेली गाडी (क्र. MH 12 DG 8954) उभी करून मोठ्या आवाजात गाणी वाजवत होता. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.या प्रकाराची दखल घेत लोणंद पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भारतीय दंड संहिता कलम २६८, २९०, २९१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३१(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल साहिल पवार यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोहवा नाळे हे करत आहेत. घटनेची पाहणी सपोनि सुशील भोसले यांनी केली.