फलटण चौफेर, दि. १३ ऑगस्ट २०२५
साताऱ्याचा जीभेवर रेंगाळणारा सुप्रसिद्ध मावा केक आता फलटणकरांच्या मनावरही अधिराज्य गाजवणार आहे. साताऱ्यातील देवत्व बेकर्स या खवैय्यांच्या आवडत्या नावाचा स्पेशल मावा केक आणि इतर उत्पादने आता फलटण येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये उपलब्ध होणार आहेत. १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनी या गोड प्रवासाचा शुभारंभ होणार असून, रामनगरीत ‘स्वादोत्सव’ साजरा होणार आहे.
मावा केक म्हंटलं की ‘देवत्व’च
मावा केकची चव घ्यायची म्हंटलं की सर्वप्रथम नाव आठवतं, ते म्हणजे देवत्व बेकर्सचं. त्यांच्या खास मावा केकने वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, कौटुंबिक समारंभ, अतिथी सत्कार अशा प्रत्येक प्रसंगी खवैय्यांना मोहित केलं आहे.
राज्यापासून परदेशापर्यंतचा गोड प्रवास
शुद्ध शाकाहारी व ड्रायफ्रूटने समृद्ध असलेला हा मावा केक साताऱ्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, बेंगळुरू, अहमदाबाद, सुरत, दिल्ली अशा अनेक शहरांत लोकप्रिय आहे. दुबई, कॅनडा, जर्मनीसारख्या देशांतील भारतीयांनाही या चवीने भुरळ घातली आहे.
सर्वांचा आवडता स्वाद
सामान्य ग्राहकांपासून ते सेलिब्रिटी, अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक — सर्वांनीच या मावा केकची प्रशंसा केली आहे. ‘लई भारी’, ‘अप्रतिम’, ‘दिल मांगे मोअर’ अशा प्रतिक्रिया वारंवार मिळतात. आता फलटणकरांनाही हा अनुभव मिळणार आहे, अशी खात्री देवत्व बेकर्सच्या मालकीण अस्मिता पाटील आणि भक्ती एंटरप्रायजेसचे प्रो. प्रा., पत्रकार यशवंत खलाटे-पाटील यांनी व्यक्त केली.
📍 कुठे मिळणार?
१५ ऑगस्टपासून राममंदिराशेजारी, कसबा पेठ, बुरुड गल्ली येथील अश्विनी लेडीज शॉपी (पेंढारकर इलेक्ट्रॉनिक्स शेजारी) येथे मावा केक, व्हॅनिला बटर केक, चॉकलेट केक उपलब्ध राहतील.
📞 संपर्क: 9421213656 / 9822973344
‘राजपुरोहित’चे नमकीनही आता फलटणमध्ये
साताऱ्यातील प्रसिद्ध राजपुरोहित नमकीन प्रथमच फलटणमध्ये उपलब्ध होणार आहे. फरसाण, बाकरवडी, लसूण बाकरवडी, पोहा चिवडा, मका चिवडा, लसूण शेव, मेथी वडी अशा चटकदार पदार्थांचा आस्वादही फलटणकरांना घेता येणार आहे.