Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्य पोलिस दलात १५ हजार पदांची मेगा भरती; मंत्रिमंडळाची मंजुरी



फलटण चौफेर दि १३ ऑगस्ट २०२५
राज्य पोलिस दलात तब्बल १५ हजार पदे भरती करण्यास अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. २०२४-२५ या कालावधीतील पोलिस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.बैठकीत विविध योजनांसाठी आवश्यक हमी रकमेच्या अटींबाबतही निर्णय घेण्यात आला. पोलिस भरती प्रक्रियेसाठी यावेळी OMR प्रणालीचा वापर होणार असून, २०२२ आणि २०२३ मध्ये जाहीर झालेल्या पण भरती न झालेल्या पदांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार आहे.


या अंतर्गत पोलिस शिपाई ८,०८९, पोलिस शिपाई चालक २३४, बँड्समन ९४, सशस्त्र पोलिस शिपाई ८,१३३ आणि करारावरील कर्मचारी १५ पदे अशा एकूण १५,५६५ पदांची भरती होणार आहे.जिल्हानिहाय भरती प्रक्रिया संबंधित जिल्हा स्तरावर पार पडेल. OMR पद्धतीने लेखी परीक्षा होणार असून, अर्ज मागवणे, अर्जांची छाननी आणि पुढील टप्प्यांची माहिती लवकरच जाहीर होणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.